मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली गावात स्व. बानय्या दुर्गम यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती कोटापल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भाजप आदिवासी आघाडी अध्यक्ष सुरेश मडावी यांनी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांना दिली.
माहिती मिळताच राजे साहेबांनी तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मय्यत परिवाराला आर्थिक मदत पोहचवली. स्व. बानय्या दुर्गम यांच्या पत्नी चंद्रक्का दुर्गम व मुलगा किरण दुर्गम यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सिरोंचा भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, उपसरपंच सुरेश मडावी, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष श्रीनिवास चिलकामारी, गगन पोलमपल्ली, राकेश इम्बरी, संतोष यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

