Thursday, June 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रस्ता सुरक्षा अभियानाला गती.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 21, 2026
in Uncategorized
0 0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रस्ता सुरक्षा अभियानाला गती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*वाहतूक नियमभंगाविरोधात पंधरा दिवसांत 615 प्रकरणांवर कारवाई; 14.46 लाखांचा दंड वसूल*
*उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष मोहीम*

*वाहन चालकांचे समुपदेशन करून रस्ता सुरक्षा जनजागृतीलाही प्राधान्य*

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली, (जिमाका) दि. 21 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मागील पंधरा दिवसांपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत एकूण 615 प्रकरणे नोंदवून संबंधितांकडून 14 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या 22 वाहनचालकांवर, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या 12 जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 72 चालकांवर तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्या 64 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वेग नियंत्रक नसलेल्या 12 वाहनांवर, ताडपत्रीविना मालवाहतूक करणाऱ्या 21 वाहनांवर, मागील सुरक्षा संरचना (आरयुपीडी) नसलेल्या 35 तसेच बाजूची सुरक्षा संरचना (एलयुपीडी) नसलेल्या 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या 13 वाहनांवर, वैध परवाना नसलेल्या 27 चालकांवर, परावर्तिका नसलेल्या 82 वाहनांवर तसेच धोकादायक ‘डॅझलिंग लाईट’ वापरणाऱ्या 93 वाहनांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 7, नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्या 37, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 7 तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या 16 वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
तसेच अतिभार वाहतूक करणाऱ्या 14 वाहनांवर, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवर, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या 14 जणांवर तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या 14 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अग्निशामक यंत्रणा व फर्स्ट एड किट नसलेल्या 23 वाहनांवर तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा नसलेल्या 13 वाहनांवरही दंड आकारण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहन चालकांचे समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Previous Post

भाजपा पदाधिकारी, नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत थेट हल्लाबोल:

Next Post

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In