Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गेदा गावाजवळ दुचाकीचा भीषण अपघात; दोन मावसभाऊंपैकी एक ठार, दुसरा गंभीर जखमी

Madhukar gongale by Madhukar gongale
May 25, 2026
in Uncategorized
0 0
0
गेदा गावाजवळ दुचाकीचा भीषण अपघात; दोन मावसभाऊंपैकी एक ठार, दुसरा गंभीर जखमी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

एटापल्ली : तालुक्यातील गेदा गावाजवळ भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे गेदा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर तोंदे नरोटे (वय 25) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर रितिक दोहे नरोटे (वय 16) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मावसभाऊ असून रेगडी गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातावेळी ते दुचाकी क्रमांक MH33AE0813 वरून प्रवास करत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कृष्णार येथे एका कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रम आटोपून ते परत आपल्या गावी येत असताना गेदा गावाजवळ दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की सागर तोंदे नरोटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रितिक नरोटे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी रितिक नरोटे यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच एटापल्लीचे पोलीस निरीक्षक नागरगोजे साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक साखरे साहेब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे रेगडी गावात हळहळ व्यक्त केली जात असून नरोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भरधाव वेग, खराब व अरुंद रस्ते, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव ही अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

कोणसरी येथील 1995 च्या बॅचचा गेट-टुगेदर ठरला अविस्मरणीय; 30वर्षांनी मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र.

Next Post

अहेरीच्या ‘लक्ष्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी’तर्फे २२ गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरीच्या ‘लक्ष्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी’तर्फे २२ गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा.

अहेरीच्या 'लक्ष्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी'तर्फे २२ गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In