पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे . दिनांक २१/१०/२०२२ रोजी रात्री ०८/०० वाजता ते दिनांक- २२/१०/२०२२ रोजी पहाटे ०५/०० वाजताचे दरम्यान शंभु महादेव मंदिर, फुरसुंगी पुणे. या मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी फोडून काही इसमांनी त्यामधील रक्कम लंपास केलेली होती. हडपसर पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी , तपासपथकातील सहप्रभारी अविनाश शिंदे , पोलीस अंमलदार समीर पांडुळे यांनी सदर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये तीन मुले सदरची दानपेटी उचलून बाजुला घेवुन जात असताना दिसले. तपासपथकाने सीसीटीव्हीचा माग काढून त्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावरुन पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, य निखिल पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरची तीन्ही मुले एम. जी. रोड पुणे येथे आहेत अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी ते तिघेजण मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
तपासात रेकॉर्डवरिल विधीसंघर्षग्रस्त मुलगा तसेच त्याचे इतर दोन साथीदार यांनी मिळून सदर मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी हडपसर गावठाण राममंदिराजवळील युनिकॉर्न एम.एच.१२ जी.सी. १७२७ हि गाडी चोरुन त्या गाडीचा वापर चोरी करण्यासाठी केला. चोरी करुन झाल्यानंतर पुन्हा चोरी केलेली मोटर सायकल त्याठिकाणी पार्क केली. मंदिरात चोरी करण्यापुर्वी तीघांनी शंभु महादेव मंदिरामध्ये जावुन त्याठिकाणचे मंदिराचे सर्व परिसराचे फोटो काढून मंदिरांचे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता तसेच बाहेर जाण्यासाठी रस्ता पाहिला व त्याठिकाणी कोणत्या वेळेला पुजारी येतात व भावीक येतात याचा पुर्ण अभ्यास करून प्लॅन करून सदर मंदिरामध्ये चोरी करण्याचे नियोजन केले. व त्यांनी मिळून मंदिरातील दानपेटी फोडली त्यामधील रक्कम हि यांना उचलता न आल्याने त्यांनी त्यामधील काहि रक्कम त्याच ठिकाणी सोडलेली होती. विशेष म्हणजे त्यांनी मिळालेली रक्कम हि लोकसेवा हनुमान मंदिर येथील जवळील गार्डन मधील कचरा टाकण्याचे डस्टबीनच्या स्टॅच्युमध्ये सदरची रक्कम असलेले पोते लपवुन ठेवलेली होती. सर्व दक्षिणा रक्कमपैकी २२,२५०/- रुपये जप्त करण्यात आलेले आहे. तिघांनी मिळून फैशन स्ट्रीट कॅम्प पुणे येथे हौस मौजमजेसाठी व नशा करणेसाठी दानपेटीमधील रक्कम खर्च केलेली आहे. सराईत गुन्हेगार राहुलसिंग भोंड याचे फोटोचा टॅटू छातीवर / हातावर काढीत असताना तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामदैवताचा गुन्हा अतिशय प्राधान्याने आणि तात्काळ उघडकीस आणल्याबद्दल हडपसर तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा फुरसुंगी ग्रामस्थांनी सत्कार आयोजीत केलेला होता..
सदरची कामगिरी ही मा. श्री. नामदेव चव्हाण सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, सुरज कुंभार व इतर तपासपथकातील अंमलदार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

