पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : दिनांक ३१/१०/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे त्यांचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठ परिसरात जबरी चोरी करून नेलेले मोबाईल चोरणारे आरोपी है। त्यांचेकडील चोरीचे मोबाईल विक्रीसाठी राष्ट्रभुषण चौकीत येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
त्याअनुशंगाने युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह एकुण चार आरोपीतांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांचेपैकी एक विधिसंषत बालक यास ताब्यात घेवुन, इतर अटक केलेल्या आरोपींची नामे १) अनुज जितेंद्र यादव, वय- १९ वर्ष, रा. घरकुल सोसायटी, लेन नं.३. ओम गंगोत्री सोसायटी, वडगाव शेरी, पुणे २) दक्ष जुबेर गिलानी, वय २० वर्ष, रा. गायत्री सदन, तिसरा मजला, वडगाव शेरी, पुणे ३) राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा वय २३ वर्ष, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे अशी असल्याचे सांगीतले.
सदर आरोपींकडे कसून चौकशी करता, त्यांनी लक्ष्मीपुजनाचे रात्रीचे वेळी बुधवार पेठत गाड्यांची तोडफोड करून रोडवरती थांबलेल्या लोकांना मारहाण करून, त्यांचेकडील मोबाईल लुटल्याची कबुली दिली असून, त्यांचे कब्जातून २७,०००/- रू किये दोन ओपो कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट जप्त करून फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.२०३/२०२२ भादवि कलम ३९२, ४२७, ५०४, ५०६, ३४ हा गुन्हा उघडकीस आणला असून, त्यांचेकडून जप्त करण्यात आलेल्या दुस-या मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे. सदर आरोपी पैकी राहुल उर्फ बाबा विनोद बारयासा याचे विरूध्द गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपी यांना पुढील तपास व कार्यवाहीसाठी फरासखाना पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ना.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट – १ गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक, संदीप भोसले, पोलीस उप-निरीक्षक, सुनिल कुलकर्णी, पोलीस उप-निरीक्षक रमेश तापकीर पोलीस अंमलदार, अमोल पवार, इग्रान शेख, अजय थोरात, विठ्ठल साळुंखे, अभिनय लडकत, तुषार माळवदकर,निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.