पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : दि.०७.११.२०२२ रोजी ओम स्पा, साईकृपा बिल्डींग, अक्षय कॉलनी वारजे माळवाडी, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने, सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने, तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०२ पिडीत महिला यांची सुटका करण्यात आली आहे..
सदर स्पा मॅनेजर व पाहिजे आरोपी स्पा मालक यांचेविरूध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४२९ / २०२२ भादवि ३७० ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, आरोपी स्पा मॅनेजर व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे.. श्री. श्रीनिवास घाडगे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे या पथकाने केली आहे.
