पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
*पुणे* : दिनांक २९/१०/२०२२ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७१९ / २०२२. भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांबाबत माहीती घेत असताना पोलीस अंमलदार, मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी रौनक थोरात २ टिनुज कोळमकर व त्यांचे साथीदारांनी केला आहे. लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता यांनी येरवडा भागात जावुन आरोपीतांचा शोध घेतला असता, आरोपी १. रोनक राजेंद्र थोरात, रा. सुरक्षानगर, आंबेडकर चौक, येरवडा, पुणे २. टिनुज विलास कोळमकर, रा. सर्वधर्म सोसायटी, येरवडा, पुणे हे मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक केली आहे.
आरोपी टिनुज विलास कोळमकर याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेला एक मार्शल कंपनीचा ब्लु ट्युथ स्पीकर व एक सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सीचे घडयाळ, एक फासटेंग कंपनीचे निळया रंगाचे पटयाचे घडयाळ, एक फासटेंग कंपनीचे पिंक रंगाचे घडयाळ असे एकुण ३१,३८८/- रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांचे तपासा दरम्यान सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६२ / २०२२ भादंवि कलम ३८०, ३४ अन्वये हा गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, मा. श्रीमती सुषमा चव्हाण, गा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, रविंद्र चिप्पा, नरेंद्र महांगरे, शैलेश साठे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले या पथकाने केली आहे.