पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
पुणे युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर
*पुणे* : नविन लाईट मिटर घेवून देतो असे सांगून त्याबदल्यात रक्कम स्विकारून लाईट मिटर घेवून दिले नाही म्हणुन इसम नामे *नितीन रमेश नाईक* वय ४९ वर्षे रा महात्मा फुले पेठ पुणे याचे विरूध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुर नं १११२ / २२ भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आज रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशाने दाखल गुन्ह्यातील पाहीजे / फरारी आरोपीचा शोध घेत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत काही तासातच खबर मिळाली की, संदर्भीय दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी *नितीन रमेश नाईक* वय ४९ वर्ष रा महात्मा फुले पेठ, पुणे. हा हत्ती गणपती सदाशिव पेठ, पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने हत्ती गणपती सदाशिव पेठ, पुणे येथून त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही साठी कोंढवा पोलीस ठाणे कडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी *मा अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार व तुषार माळवदकर* यांनी केली.
