पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे:- तक्रारदार नामे श्री जयसिंग गायकवाड वय ५२ वर्षे विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ पुणे यांनी लक्ष्मीबाई नागरी पतसंस्था कोथरुड, पुणे या पतसंस्थेत झालेल्या घोटाळयाबाबत चाचणी लेखा परीक्षण करुन फिर्याद दिली की पतसंस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र बाबुराव पवार रा. कोथरूड पुणे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून पतसंस्थेच्या अनामत खात्यातून वेळोवेळी बेकायदेशिररित्या स्वतःच्या फायदयासाठी रक्कम घेऊन व त्यावरील व्याज न देवुन तसेच २० ठेवीदारांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ते पैसे स्वतःच्या फायदयाकरीता वापरून पतसंस्थेत एकुण ९,७४,४०,१६९/- रुपयांचा अपहार केला.
तसेच ठेवीदारांना चांगल्या परताव्याचे अमिष देवुन त्यांचेकडुन ठेवी स्वीकारून दि.३१/०३/२०२२ पर्यंत मुदत संपूनही ६३०२ ठेवीदारांच्या ठेवी व त्यावरील व्याज परत दिल्या नाहीत व त्यांची फसवणुक केली अश्या फिर्यादीवरून आरोपी पतसंस्थेचे चेअरमन श्री राजेंद बाबुराव पवार, नियंत्रक अभिजित भोसले व वैशाली पवार तसेच इतर डायरेक्टर चेंद्रशेखर देशमुख, संगाप्पा गोरे, दिलीप खुळे, प्रसाद माने, विजय साळवे, हॅमागी भोसले, प्रतिभा वाबळे यांचेविरुद पतसंस्थेतील अनामत खात्यातील रकमेचा अपहार करणे बोगस कर्ज प्रकरणासाठी कर्जदाराच्या सहमतीशिवाय त्याच्या केवायसी कागदपत्राचा वापर करून कर्ज प्रकरणे मंजुर करुन त्या रकमांचा स्वतःच्या फायदयासाठी संचालकांच्या सोबत कटकारस्थान करून वापर करणे ठेवीदारांना आकर्षित व्याज परताव्याचे अमिष देवुन त्यांचेकडुन ठेवी स्वीकारणे व ठेवींची मुदत संपल्यानंतर त्यांच्या ठेवी व त्यावरील व्याज परत न करणे असा गुन्हा केल्याबद्दल त्यांचेविरुध्द कोथरुड पो स्टे गुरनं .२८० / २०२२ भादवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७५ १२० ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चेकलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दिनांक २८/१५/२०२२ रोजी दाखल केला आहे.
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी पतसंस्थेचा चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार वय ५४, रा. कोथरुड, पुणे यास अटक केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री विजयकुमार पळसुले यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा इंदलकर, सपोनि मयुर वैरागकर, पो. अमलदार रमाकांत कांबळे, मुसळे, वसंत वाघमारे, सोनाली गायकवाड, रुपाली दळवी, सोनावणे, ज्ञानेश्वर कुल्लाळ यांनी केली आहे.