पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- फिर्यादी यांनी अवैदय सावकार योगेश पंडीत भालेराव, वय २७ वर्षे रा. गोकुळनगर, बाजारपेठ लोहगाव रोड, धानोरी पुणे याचेकडून माहे एप्रिल २०२१ मध्ये रुपये २ लाख रुपये व माहे फ्रेबुवारी २०२२ मध्ये रुपये २ लाख रोख असे मिळून ४ लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजदराने घेतले असता व त्याचे मोबदल्यात मुद्दल व व्याज असे मिळून एप्रिल २०२१ ते माहे ऑगस्ट २०२२ रोजी पर्यन्त एकूण ४,८०,०००/- रुपये सावकार योगेश पंडीत भालेराव यास परत केले असताना देखील सावकार योगेश पंडीत भालेराव याने दि.१७/११/२०२२ रोजी फिर्यादी यांना फोन करून शिवीगाळी करून त्यांचे टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी देवून फिर्यादी यांचेकडून दंड म्हणून आणखीन अतिरिक्त ४,८०,०००/- रुपयेची मागणी करीत असल्याने त्याबाबत फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर येथे तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जावर कारवाई करण्याचे आदेश वरीष्ठांकडुन प्राप्त झालेले होते.
सदर अर्जा चौकशीवरुन दखलपात्र गुन्हा घडल्याचे निष्पन्न झल्याने फिर्यादी यांनी अवैदय सावकार योगेश पंडीत भालेराव यांचे विरुद्ध फिर्याद दिल्याने सावकार इसमावर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. २५६ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८४,३८५ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, गा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, गा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, सहा. पोलीस निरीक्षक चांगदवे सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल गंगडे, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे, सदोबा भोजराव, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, राव सपकाळ, महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.

