अनवर शेख पुणे शहर प्रतिनिधी
आळंदी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सो यांनी सर्व पोलीस ठाणेस घरफोडी, मोटार सायकल चोरी यासारख्या गुन्हयांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक 02/12/2022 रोजी आळंदी पोलीस स्टेशन गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार पोहवा / 505 लोणकर व पोकों / 1306 खेडकर असे सोळु परीसरात पेट्रोलिंग करीत असताना सोळु गावातील रॉयल हॉटेल समोरून एक इसम आळंदी पोलीस स्टेशन गु रजि. न 351/2022 भा. दं. वि. कलम 379 मधील चोरीस गेलेली बजाज पल्सर 180 मोटार सायकल नंबर एम. एच. 14 सी. एन. 9511 हिचेवर मरकळ गावाकडे जाताना मिळुन आल्याने त्यास थांबवुन नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नासीर शमशुद्दीन शेख, वय 36 वर्षे, रा. सोळु, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. 11/4675 कदील चौक, इकबाल कॉलनी, एम. एस. के. मिल, जिलानाबाद, गुलबर्गा, कर्नाटक असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत चौकशी केला असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास चौकशीकामी पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे तपास केला असता त्याने दिनांक 27/11/2022 रोजी दुपारी 03:30 वाजताचे सुमारास धानोरे, ता. खेड, जि. पुणे गावचे हद्दीतील हॉटेल पेशवाई समोरून सदर मोटार सायकल चोरून नेल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हा आळंदी पोलीस स्टेशन येथे गु रजि. नं. 351 / 2022 भा. दं. वि. कलम 379 मध्ये पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना अटक आरोपी नासीर शमशुद्दीन शेख, वय 36 वर्षे, रा. सोळु ता. खेड, जि. पुणे, याचेकडुन एकुण 2,55,000/-रूपये किंमतीच्या एकुण 08 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन खालीलप्रमाणे 05 गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाच्या टिमला यश आले आहे. तसेच इतर 3 मोटार सायकल चे मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु असुन पुढील तपास सुरु आहे.
1) आळंदी पोलीस स्टेशन गु.र.नं. 351 / 2022 भा.दं.वि. कलम 379 ( मोटार सायकल चोरी) 2) दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. 176 / 2022 भा.दं.वि. कलम 379 (मोटार सायकल चोरी ) 3) दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. 296 / 2022 भा.दं.वि. कलम 379 (मोटार सायकल चोरी) 4) दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं. 510 / 2022 भा.दं.वि. कलम 379 (मोटार सायकल चोरी ) 5) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. 371 / 2017 भा.दं.वि. कलम 379 ( मोटार सायकल चोरी )
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे सो. पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 श्री. विवेक पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे सो यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुनिल गोडसे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन, श्री रमेश पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आळंदी पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक जोधळे, आर. एम. लोणकर पोलीस हवालदार / 505, बी. बी. सानप पोलीस नाईक / 1921, बी. व्हि. खेडकर पो शि/ 1306, एन. के. साळुंखे पोशि/ 1241. के. सी. गजें पोशि/ 1939, जी. व्हि. आढे पोशि/ 1931, व्ही. आर. पालवे पो.शि. / 2268 यांनी केली