पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
पुणे :- शहर पोलीस दलातील ८ बहिर्जी नाईक पुरस्कार प्राप्त पोलीस अंमलदार व विविध शाखांमधील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना *सहायक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक* यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. *१) नितीन मारूती मुंढे, पोलीस नाईक ७३१७ युनिट ६, गुन्हे शाखा २) महेश त्रिंबक बामगुडे, पोलीस हवालदार ३५८९ युनिट १, गुन्हे शाखा ३) कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ७८०५ युनिट ६, गुन्हे शाखा, ४) ऋषीकेश व्यवहारे, पोलीस अंमलदार २६८८, युनिट ६, गुन्हे शाखा ५) शेखर बाळासाहेब काटे पोलीस अंमलदार १०४५२ युनिट ६, गुन्हे शाखा ७) गजानन साहेबराव सोनुने पोलीस अंमलदार ८४०३ युनिट २, गुन्हे शाखा ८) ज्ञानेश्वर चित्ते पोलीस अंमलदार ८७६१ युनिट ३, गुन्हे शाखा ६) मारूती नामदेव पारधी पोलीस अंमलदार ५८१९ अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा* यांचा समावेश आहे.
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांनी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित केलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्त आयोजित गुरु महात्म्य पुरस्कार वितरण व संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये पुणे शहर पोलीस दलातील एकूण ०८ बहिर्जी नाईक पुरस्कार प्राप्त पोलीस अंमलदार, तसेच विविध शाखांमधील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा वरील ८ जणांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

