पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दिनाक ०४/१२/२०२२ रोजी मंगळवार पेठ येथिल सोमेश्वर मंदिराच्या आवारात फिर्यादी किर्तीकुमार सतिश जाजु यांचे गोडावून आहे. गोडावून मध्ये गाल उत्तरवित असताना फिर्यादी हे त्यांचे कामगारांना सदर ठिकाणी थुंकुन घाण करतात त्या बाबत मंदिराचे पुजारी बडबड करित होते असे सांगत असताना पुजारी यांचा नातु तेजस व मुलगा सचिन रसाळे यांनी बाचाबाची करुन कंबरेच्या पटयाने, लाकडी दांडक्याने लोखंडी रॉडने साथीदारासह मारहाण करुन गंभीर जखमी केले त्याबाबत फरासखाना पोलीस ठाणे येथे गुरनं २३६ / २०२२ भादवि कलम ३२६ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्हा दाखल झाले पासून संशयित आरोपी फरारी होते.
दि. ०७/१२/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे तेजस व सचिन रसाळे हे शालिनी हॉटेल रास्ता पेठ पुणे येथे मामास भेटण्यासाठी येणार असल्याबाबतची बातमी मिळाली सदर बातमी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिप भोसले युनिट १ गुन्हे शाखा यांना कळविण्यात आली त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार व मार्गदर्शनान्वये युनिट १ कडील स्टाफ सह शालिनी हॉटेल रास्ता पेठ पुणे येथे सापळा रचुन थांबले असता बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी तेजस व सचिन रसाळे हे येताना दिसले व ते शालिनी डॉटेल समोर रोडवर कोणाची तरी वाट पाहत उभे राहिले असताना त्यांना ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नावे १ तेजस अजित वाडेकर वय २२ वर्ष रा. फ्लॅट नं ०६ शामलप्रभा अर्पा लेन नं १० कृष्णा कॉलनी कोथरुड पुणे २ सचिन अजित रसाळे वय ३९ वर्ष रा. ३२ मंगळवार पेठ सिध्देश्वर मंदीर पुणे असे सांगितले त्यास युनिट १ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन फरासखाना पोलीस ठाणे येथे गुरनं २३६ / २०२२ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीस पुढील कारवाई कामी फरासखाना पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, गा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, गा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली यूनिट-प, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदिप भोसले सहा. पो. निरी आशिष कवठेकर, पो. उप निरी सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार इम्रान शेख, महेश बामगुडे, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी केली आहे.