पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर
पुणे:- सध्या पुणे शहरात गोळीबार करणाचे घटना घडत असल्याने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांनी माहिती घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज दिनांक – १७/१२/२०२२ रोजी मा. बरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर है युनिट १ कार्यालयात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना करावयाच्या कारवाई बाबत मार्गदर्शन व सुचना देत असतानाव पोलीस अमलदार दत्ता सोनवणे व राहुल मखरे यांना त्यांचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, ” भारती बैंक लेन धायरी फाटा पुणे या ठिकाणी एक इसम येणार असून त्याचेकडे पिस्टल असून तो कोणतातरी गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे ” अशी खात्रीशीर बातमी मिळालेने गुन्हे शाखख म थे प्रभारी अधिकारी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली भारती बँक लेन घायरी फाटा पुणे या ठिकाणी सापळा रचुन प्राप्त बातमीप्रमाणे एक इसम नमुद ठिकाणी येवून थांबलेला दिसताच पथकाने गणेश राजु गायकवाड, वय २१ वर्षे रा. जयहिंद चौक, मनपा शाळे शेजारी, रामनगर झोपडपट्टी, वारजे माळवाडी पुणे यास सकाळी १०/०० वा ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीमध्ये एक किं रु ६०,०००/- चे लोखंडी धातुचे देशी बनावटीचे पिस्टल व कि रु ४०००/- चे ०४ जिवंत काडतुस असे एकुण ६४,०००/- रू चा माल जप्त करून ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत पोलीस अमलदार दत्ता सोनावणे यांनी सरकरातर्फे फिर्याद दिली असून आरोपी पुढील तपास करीता सिंहगड पोलीस ठाणचे -ताब्यात देण्यात आला आहे
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, मा. श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, राहुल मखरे, दत्ता सोनवणे, शशीकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, महेश बामगुड, विठ्ठल सांकुखे यांनी केली आहे.