पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर
पुणे :- हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५६२ / २०२२. भा.द.वि. कलम ३७९.३४ या गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली यूनिट ६ चे अधिकारी व अंमलदार करित असताना दिनांक ३१/१२/२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार राहुलसिंग मोड याने केलेला असून तो गंगानगर कॅनॉल शेजारी असलेले मोकळे मैदानात हडगर पुणे येथे थांबलेला असुन त्याचे ताब्यातील गाडी ही चोरीची आहे. सदरची माहिती श्री रजनिश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे राहुलसिंग रविंद्रसिंग भौंड, वय १८ वर्ष, रा. कॅनॉल शेजारी, तुळजा भवानी वसाहत, हडपसर, पुणे यास त्याचे ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत तपास करता सदरवी मोटार सायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने मोटार सायकल जप्त करून नमूद आरोपीस गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडून ०३ मोटार सायकली, ०३ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम, गुन्हयात पापरलेले हत्यार असा एकूण १.२२.४००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यामध्ये नमूद गुन्हयासोबतच १ दरोडयाचा गुन्हा, ३ जबरी चोरीचे ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याचे साथीदार कफ मुनाजीर अन्सारी यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेत आहोत, अटक आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले.
4) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९५. ३०७ ५०४, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ २) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०६/२०२३ भादंवि कलम ३९२, ३४३) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६२५/२०१२ भा.दं.वि. कलम ३९४,५०४ हरूपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८९ / २०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
५) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८१/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२८ / २०२२ मा.पं.वि. कलम ३७९(१७) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १२९४/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ ८) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५६२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९.
आरोपी राहुलसिंग रविंद्रसिंग भोड हा खडकी पोस्टे कडील गुन्हयात, हडपसर पो.स्टे कडील २ गुन्हयात भोसरी पोर कडील १ गुन्हयात व कोंढवा पो.स्टे कडील १ गुन्हयात पाहिजे आरोपी आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार मा.राह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री अमोल शेंडे, मा.सहा पोलीस आयुक्त, मुन्हें शाखा, पुणे शहर. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस उप-निरीक्षक, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार, नितीन मुंडे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश टिळेकर, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, प्रतिक लाहिगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन चाडगे, अशफाक मुलाणी, सुहारा तांबेकर व ज्योती काळे यांचे पथकाने केली आहे.