🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट तर्फे 2500 राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांना पाठविल्या “सैनिकांकरीता राख्या” हा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. जगदीश यावले व प्रा. मेघा फासगे उपस्थित होते. संचालन कॅडेट कांचन राऊत व मयुरी उईके यांनी केले तर आभार कॅडेट सुप्रिया यादव यांनी मानले. यशस्वीतेकरीता सार्जंट भाविक आखूड, राधिका बोटफोले, वैष्णवी तुमडाम, दिक्षीका महेशगौरी, आचल वाटकर, रोशनी गौतम, प्रतीक्षा राऊत व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी अथक प्रयत्न केले.