अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नवीन वर्षाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने ”गजल व सुफी ”संगीत संध्या आय एम ए हॉल सावनेर येथे 10 जानेवारीला सायंकाळी हिंदी सुमधुर गजल व सुफी गायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध शहजाब शेख ऑर्केस्ट्रा ग्रुप होते.
या कार्यक्रमाची सुरुवात आयएमए सावनेरचे अध्यक्ष डॉ.जीवतोडे, सचिव डॉ.विलास मानकर, कोषाध्यक्ष डॉ.अमित बाहेती, शाखेचे अध्यक्ष डॉ.विजय धोटे, डॉ.विजय घटे, डॉ.निलेश कुंभारे तसेच डॉ.विनोद बोकडे, डॉ.आशिष चांडक व डॉ.परेश झोपे यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरचे इतर सदस्य डॉ.चंद्रकांत मानकर, डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ.रवींद्र नाकाडे, डॉ.अशोक देशमुख, डॉ.हेमंत पाटील, डॉ.करुणा बोकडे, डॉ. गौरी मानकर, डॉ.पूजा जीवतोडे, डॉ.सोनाली कुंभारे, डॉ.स्मिता भुडे, डॉ.रेणुका चांडक, डॉ. अंकिता बाहेती, डॉ.शिवम पुण्यानी, डॉ. प्राची भगत, डॉ.अजय मोंढे, डॉ. रिंकी मोंढे, डॉ.रवि ढवळे, डॉ. प्रवीण चौहान, डॉ.श्वेता चौहान, डॉ. संदीप गुजर, डॉ. नितीन पोटोडे, डॉ.मोनाली पोटोडे, डॉ.प्रीतम निचट, डॉ. सचिन घटे, डॉ.रेणुका चांडक, डॉ.मयूर डोंगरे, डॉ.राजेंद्र मालापुरे, डॉ. जयंत कडसकर, डॉ. नरेंद्र डोमके, डॉ.कांचन डोमके, डॉ.गुंजन धुंडेले, डॉ.रश्मी भगत, डॉ.उमेश गायकवाड उपस्थित होते.आय एम ए तर्फे डॉ. विलास मानकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348