नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व दिव्यांग शिव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांगजन रेल्वेप्रवास सवलत नोंदणी शिबीर “सिद्धेश्वर तलाव पाटील वाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 हून अधिक दिव्यांग बांधवांनी भाग घेऊन आपली नोंदणी करून घेतली.
दिव्यांगांसाठी राबवलेल्या या योजने बद्दल खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी दिव्यांग शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश घोरपडे, गुरुनाथ बिराजदार, अभिजीत शिंदे, नितीन जगदाळे,राजू अमले,कैलास कुराडे, सचिन त्रिवेदी, नंदु हुलावले, सुधीर बेलोसे यांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले या पुढे ही दिव्यांग शिवक्रांती सेने कडून दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे असे सांगण्यात आले आहे