पीडित आलाम परिवाराला विचारपूस करताना जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट..!!
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम (खाँदला) पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबजनक घटना समोर आली होती. राजाराम (खाँदला) पासून 5 कि.मि. अंतरावर असलेल्या मौजा पत्तीगाव येते बाल विकास प्रकल्प अतंर्गत मिनी अंगणवाडी केंद्र सुरू असून अंगणवाडी सेविका म्हणून राजाराम (कोंकापरी) येतील रहिवासी असलेल्या महिलेला काही अज्ञात व्यक्तीने जंगलात नेऊन दोरीच्या सहाय्याने बांधून सोडून दिले होते. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली होती.
यांची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देवून घडलेली घटनेची व तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी विलास सिडाम नगर सेवक अहेरी, महेश लेकुर् ग्रा. पं. सदस्य, बाळू ओड्डेटीवार, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक हे प्रामुख्याने उपस्थीत होते.