✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहरातील एका खासगी नर्सिंगच्या महाविद्यालयात मंगळवार ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह, विद्यार्थी तसेच काही पालकांनी राडा घातला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र न मिळाल्याने हा प्रकार घडला. यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयात पालकांसह विद्यार्थी तसेच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार आज नर्सिंगच्या प्रथम सत्राचा पेपर हाेता. मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्रच मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले हाेते. प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक सत्राचे नुकसान हाेणार या भीतीने काहींनी त्यांच्या पालकांना बाेलावून घेतले. त्यानंतर पालकांनी महाविद्यालय व्यवस्थापनास जाब विचारला. परंतु कॉलेजच्या स्टाफला व्यवस्थित माहिती देता आली नाही. त्यातच मनसे कार्यकर्ते महाविद्यालयात पाेहचले. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र का दिले गेले नाही असे म्हणत महाविद्यालयात राडा घातला. यावेळी महाविद्यालयातील खूर्चींच्या नुकसान झाले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348