✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 18 जानेवारी:- बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्याने आपल्या ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. जिनिलिया आणि रितेश या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. वेड हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटांगृहांमध्ये खेचण्यात यश मिळवलं आहे. वेडचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सध्या सुसाट सुटलं आहे. पाहूया वेड बॉक्स ऑफिस कलेक्शनची लेटेस्ट अपडेट.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री जिनिलिया देशमुखने पहिल्यांदाच मराठीमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आहे. सोबतच जिनिलियाने तब्बल 10 वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अभिनेत्रीने कमबॅक करण्यासाठी चक्क मराठी सिनेमा निवडल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनेत्रीचं कौतुक केलं जात आहे. सोबतच अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.
रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल ठेवताच धुमाकूळ माजवला आहे. अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या रितेश आणि जिनिलिया या मराठमोळ्या जोडीला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसा पासूनच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 20.18 कोटींची कमाई करत सर्वांनाच थक्क केलं होतं.
दरम्यान आता चित्रपटाचा नवा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट्स समोर आला आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.4कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण तब्बल 48 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे.
वेडचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असंच सुरु राहिलं तर हा चित्रपटसुद्धा सैराटला टक्कर देणारा ठरू शकतो असं म्हटलं जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवलं होतं. शंभर कोटींमध्ये प्रवेश करणारा हा पहिला सिनेमा होता. आता वेड हा रेकॉर्ड मोडीत काढणार कायाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्याने आपल्या ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे.