नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- भाजपा पदाधिकारी कथित मारहाण प्रकरणी मा. नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना हायकोर्टाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी प्रशांत जाधव याच्या विरोधात देखील गुन्हा रजि. क्र. ३०४/२०२२ अन्वये विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला असून राजकीय हेतूने प्रेरीत होऊन विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, असा युक्तिवाद रेपाळे यांच्या वकिलांनी केला. त्यावर मा. न्यायालयाने मा. नगरसेवक विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
विकास रेपाळे व नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ ॲड मनोज मोहिते व ॲड विशाल भानुशाली यांनी युक्तिवाद केला.