नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:-
लोकप्रिय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्याचे वडील ऑनलाईन सेक्सटोर्शनला बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सेक्सटोरशनमुळे पिडीत पित्याचे ऑनलाईन 90 हजाराचे नुकसान झाली आहे. वर्सोवा पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. 75 वर्षीय तक्रारदार व्यक्तीला 10 जानेवारीला संध्याकाळी 7 च्या सुमारास एक फोन आला. त्यात एक महिला अश्लील हावभाव करत होती .फोन आला तेव्हा तक्रारदार त्यांच्या वर्सोव्यातील राहत्या घरी होते. लगेच कॉल कट केला. काही वेळातच त्याना त्याच नंबरवरून व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ आला. तो नंबर तक्रारदाराने ब्लॉक केला 12 जानेवारी रोजी पीडित व्यक्तीला दुसर्या नंबरवरून कॉल आला आणि कॉलरने स्वतःची ओळख पोलीस निरीक्षक ऋषीलाल शुक्ला म्हणून दिली. कॉलरने पीडित व्यक्तीला सांगितले की तो एका महिलेशी अश्लील संभाषण करताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला होता, महीलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.कॉलरने पीडितेला पुढे धमाकवत नंतरचे दोन वर्ष तुरुंगात जाऊ शकतो असा इशारा दिला, त्याबदल्यात पैशांची मागणी केली. त्याला बळी पडून पुढील काही तासांत, कॉलरने पीडितेकडून एकूण 89 हजार रुपये घेतले. पिडीत व्यक्तीने 13 जानेवारी रोजी आपल्या मुलाला आणि सुनेला या घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आली.