वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोथरूड:- रिपब्लिकन सेना कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी विशाल सरवदे यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. विशाल सरवदे हे कोथरूड येथील रिपब्लिकन सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणुन सर्वपरिचित आहेत. विशाल सरवदे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, रिपब्लिकन सेनेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी विशाल सरवदे यांची निवड रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने सागऱजी डबरासे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती अंतर्गत कोथरूड विधानसभा क्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि पक्षाच्या निर्णय संदर्भात संपूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहेत. विशाल सरवदे यांच्या निवडीचे रिपब्लिकन सेना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
रिपब्लिकन सेनेने दिलेल्या संधीचे सोने करणार: विशाल सरवदे
रिपब्लिकन सेनेच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर विशाल सरवदे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले की, तालुक्यात रिपब्लिकन सेना ही न्याय हक्क आणि अधिकारातील लढणारी एक चळवळ आहे. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मा. फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचा हा महामेरू तम्माम नागरिकांचा हक्काचा प्रश्नाला वाचा फोडणारे आहे. मी गोर गरिबांचे प्रश्न सोडविणार असून रिपब्लिकन सेना तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहे. याबरोबरच मला जी रिपब्लिकन सेनेने संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचा आभारी असून पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार आहे.