मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- वाहतूक निरीक्षक राजेंद्र वैद्य यांची बदली अचानक पणें करण्यात आले. कामगारांकडून कोणतेही तक्रार नसताना सुद्धा त्यांची बद्दली कशी काय केले.असा सवाल उपस्थित होत आहे. करिता जितेंद्र राजवैद्य यांची बदली तत्काळ रद्द करून त्यांना अहेरी आगारातच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी एसटी कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी एसटी कष्टकरी कामगार संघटनचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार, हेमंत पुल्लीवर उपाध्यक्ष, एस व्हीं कुमरे अगार सचिव, आसिफ कुरेशी कोषाध्यक्ष, सत्यनारायण कुमरे, प्रदीप मेश्राम, महादेव कोडापे, अंकुश येरकड, नवनाथ घायाळ, गणेश मोहूर्ले, राजु श्रीरामवार, व समस्त एसटी कर्मचारी कामगार उपस्थित होते.