पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे:- दि. १०/१२/२०१२ रोजी फिर्यादी हे रात्रौ कामावरुन त्यांचे राहते घरी जात असताना त्यांचे पाठीमागुन येणा-या दोन दुचाकी गाडीवरील तीन अनोळखी इसमांनी व त्यांची एक महिला साथीदार यांनी फिर्यादी यांना “तुझ्याकडुन मागे दोन अॅक्सीडेंट झालेले आहेत. त्या अॅक्सीडेटचा जो काम ४०,०००/- रु. खर्च असेल तो द्यायचा नाहीतर तुझा हात उपसून काढुन तुझं आयुष्य उध्वस्त करणार तु प्रॉपर पुण्याचा दिसत “नाही” अशी धमकी देवून त्यांना जबरदस्तीने मित्राकडुन फोन पे वरुन घेण्यास लावुन ते पैसे बँकेच्या एटीएम मधुन जबरदस्तीने २०,०००/- रु रोख स्वरुपात काटुन घेवुन च फोन पे अकाऊंटवरून २०,०००/- रु घेवुन त्यांना जबर मारहाण केलेबाबत दत्तवाड़ी पो स्टे येथे गु.र.नं. २८६ / २०२२ भा.द.वि. कलम ३९४,५०४, ५०६, ३४ •प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) इरफान इस्माईल सैय्यद वय ३० वर्षे, रा. सर्व्हे नं. १६५. कामठे वस्ती, गणेश चौक, साडेसतरा नली रोड, माळवाडी, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २)शरद ऊर्फ हॅनी रावसाहेब आहिरे, वय २६ वर्षे, रा. मोहोळ बिल्डींग, म्हाळुंगे-नांदे, चांदे रोड, पुणे, 3)शंकर औदुंबर पकाले, वय २७ वर्षे, रा. गोविंद निवास, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, पुणे तसेच एक महिला (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी 4) इरफान इस्माईल सैय्यद (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा व जबरी चोरी असे मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी यांनी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असून, अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने जबरी चोरी, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशीरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणे बाबतचा प्रस्ताव दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी मा. पोलीस उप- आयुक्त, परि-३, पुणे श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना दत्तवाडी पो.स्टेगु.र.नं.२८६/२०२२.भा.द.वि. कलम ३९४,५०४, ५०६,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह
आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस, उप-आयुक्त, परि-३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग पुणे श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विजय खोमणे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे- पाटील, किशोर वळे, सद्दाम शेख, प्रशांत शिंदे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी नवनाथ भोसले, अमोल दबडे, अमित चिव्हे, गुन्ला तसेच सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, दिपक लोधा, महेश चौगले व अक्षय खन्ना यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंगलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ०७ वी कारवाई आहे.