ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जील्हातून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला आदिवासी समाजाच्या न्याय, हक्क आणि अधिकार व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या पाटणा देवी ग्रामपंचायत समोर ममता गायकवाड या आत्मदहन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की पाटणा देवी गावातील धनदांडग्या आठ नऊ एकरांच्या जामिनी असुन ग्रामपंचायत गावठाण, पूर्वीची आदिवासी स्माशान भूमीवर अर्धा एकरचे खळे केले आहे. आज आंदोलन करून दोन वर्ष झाले प्रशासन फक्त आश्वासन देते. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, प्रशासकीय आयुक्त, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना अतिक्रमण काढण्याचे हायकोर्ट आदेश यांचे असुनही पैशाच्या जोरावर अधिकाऱ्याना चिरी मिरी देऊन जानुनबुजुन अतिक्रमण काढण्याचे टाळाटाळ करत आहे.
या दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाही होणासाठी व जे सदस्य पाटणा देवी ग्रामस्थानी निवडून दिले त्यांचे व सरपंचा सह राजीनामा मागण्यासाठी कारण जे निवडून दिले ते जर न्याय देऊ शकत नाही त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. आज राष्ट्रपती आदिवासी असुनही न्याय मिळू शकत नाही. यांपेक्षा आदिवासीचे दूरदैव कोणतेच नाही. मंत्री खासदार आमदार असुनही संविधानाची आमलबजावणी होत नाही. एक आदिवासी महिला लढत असतानी तीला न्याय मिळत नाही आणि दोषी खोके घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होत नाही. तोपर्यत सर्व संघटना पाटणा देवी येथे आंदोलनासाठी बोलविल्या असुन संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा निवेदन दिले आहे .म्हणून पाटणा देवी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348