✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पवई परिसरातून एक खळबजनक घटना समोर आली होती. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हिरानंदानी भागातील एका इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून पडून एका 17 वर्षीय तरुण मोलकरींचा शंसयापद मृत्यू झाला होता. या मृत्यू नंतर ही दुर्घटना, आमहत्या की हत्या याबाबत गुढ कायम आहे.
याबाबत पवई पोलीस अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून अधिक तपास करत आहेत या संदर्भात पोलिसांनी देखील माहितीनुसार विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या तरुणीचा येथील इमारतीचा 21 व्या मजल्यावर असणाऱ्या घरात कामाचा पहिला दिवस होता सकाळी 8:-30 वाजायच्या सुमारास येथील एका सुरक्षा रक्षकाला जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्याने पाहिले असता.. ती तरुणी रक्ताच्या थोरात जमिनीवर पडली होती. त्याने त्वरित आपले वरिष्ठ आणि सोसायटीच्या पदाधिकारींना या संदर्भात माहिती दिली.
या तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असे पोलिसांनी सांगितले तरुणीचा आत्महत्या केली की काम करताना पाय घसरून पडली त्याचा तपास सुरू आहे असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत त्यांनी सांगितलं