पंकेश जाधव पुणे ब्यूरो ची
वानवडी पोलीस स्टेशन व युनिट-४ पुणे शहर
पुणे:- वानवडी पोलीस स्टेशनला दि.२०/०१/२०२३ रोजी रात्रौ ०२.३०वा इसम नामे : आसिफ शेख रा. ठाणे यांनी समक्ष येवून माहिती दिली की त्यांचे मेव्हणे नाम:- परवेझ शेख रा. लोहगांव, पुणे यांना आर्थिक व्यवहारातून वानवडीतील फातिमानगर चौकातील श्री सागर हॉटेल येथे बोलावून घेवून मारहाण करुन जबरदस्तीने अपहरण करून घेवून गेलेले आहे. सदरबाबत त्याची पत्नी नाम: लुबाना शेख यांचे मोबाईलवर वारंवार फोन करून नमूद अपहरणकारी है ०८ लाख रुपये रोख रक्कमेची मागणी करीत असलेबाबत माहिती मिळालेने सदरवायत अधिक माहिती ही दानवडी पोलीस स्टेशन अधिकारी व स्टाफ यांनी घेता सदर व्यक्तीस तळेगाव दाभाडे येथे घेवून गेलेबाबत माहिती मिळाली
आज दि. २०/०१/२०२३ रोजी पुन्हा वरील अपहरणकर्ते यांनी अपहरण झालेले व्यक्तीची सुटका हवी असलेस तळेगाव दाभाडे येथे ०८ लाख रुपये रोख रक्कम घेवून येणेबाबत अपहरणकर्ते यांचे घरचे लोकांना फोनवरून धमकी दिलेने वानवडी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफ तसेच पुणे शहर गुन्हेशाखेकडील युनिट-४ चे अधिकारी व स्टाफ यांनी संयुक्तिकरित्या अपहरणकर्ते यांना त्यांचे मागणीप्रमाणे ०८ लाख रोख रक्कम (बनावट चलनी नोटा सापळ्यांप्रमाणे देतांना सापळा रचून अपहरणकर्ते आरोपी नामे:- १) दत्तात्रय श्रीराम वारिंगे वय ३२ वर्ष धदा नोकरी रा. प्लॅट ने ओ/२, बाघेला पार्क नीडस मॉल, तळेगाव दामाशे पुणे २) महेश ब्रम्हदेव जाधव, वय ३२ वर्ष धंदा-नोकरी रा.१८/१ वाघेला पार्क कॉलनी, भारत पेट्रोलपंपाजवळ, तळेगाव दाभाडे स्टेशन, पुणे ३) सुभाष गोपाळ सोनजारी वय ४० वर्ष, धंदा मजुरी रा. नायकेंड वस्ती इगल समोर झोपडपटटी तळेगाव दाभाडे, पुणे ४) रवि हनुगत अंकुशी, वय ३४ वर्ष रा. सोनकारी बस्ती, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे पुणे यांना जेरबंद करणेत आलेले आहे. तसेच अपहरण झालेले व्यक्ती नाम प्रविण शशिकांत पाटील ऊर्फ मोहमंद परवेझ शेख वय ३९ वर्षे धंदा-मजुरी रा.प्लॅट नं. ३०१, चंद्रोदय निवास, साठे वस्ती लेन नं. २. लोहगाव बस स्टॉप जवळ, पुणे यांस अपहरण झालेपासून अवघे १२ ते १४ तासांत सुखरुप सुटका करून ताब्यांत घेतलेले आहे. सदरगायत अधिक चौकशी व तपास करून निष्पन्न होणारे बाबींनुसार तक्रार नोंद पुढील कार्यवाही वानवडी पोलीस स्टेशनकडील तपासी अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. रंजन कुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त साो. परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त सो गुन्हेशाखा, पुणे शहर व श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा पोलीस आयुक्त सो… वानवडी विभाग, पुणे शहर व संदिप शिवले अतिरीक्त कार्यभार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव, पोलीस उप निरिक्षक अजय भोसले, पोलीस उप-निरिक्षक अजय शितोळे, पोलीस अमलदार संतोष नाईक, अतुल गायकवाड, सचिन बोराटे, निळकंठ राठोड, अनिकेत वाबळे, अमोल जाधव व पुणे शहर गुन्हेशाखा युनिट-४ कडील सपोनिरी. विकास जाधव, पो. हवा. हरिश मोरे, पो. हवा. विठठ्ल बाव्हळ, पो. हवा. अजय गायकवाड, सारस साळवी, अशोक शेलार पो.ना. नागेशसिंग कुंवर, पो. कॉ. रमेश राठोड यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत.