✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- संपूर्ण राज्याला हादळवणारी संतापजनक घटना उपराजधानी नागपूर समोर येत आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. हे नराधमांनी ऐवढ्यावरच न थांबना या महिलेच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला असल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
नागपूरच्या येथील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरेवाणी गावात ही खळबळ माजणारी घटना घडली आहे. तिघा नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
12 जानेवारी रोजी मयत महिला शेतात एकटीच कापूस वेचत असताना तिथे तिघे नराधम आले. या महिलेला एकटीला पाहून तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने आळी पाळीने बलात्कार केला. या महिलेने स्वत:ला नराधमांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमांनी या महिलेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता यातील एक नराधमाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेच्या मृतदेहा बरोबर पण बलात्कार केला.
अबू उर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील अशी नराधम आरोपींची नावे आहेत. तर, मृत महिला ही कापूस वेचणारी मजुर महिला आहे. या महिलेचा पती आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी तिच्यासह हे भयानक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
गावातील नागरिकांना या महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची गांभीर्य बघत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348