✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील आजंती परिसरातील एमआयडीसी मध्ये कोरोडोचा भष्ट्राचार झाल्याची माहिती नागरिकांन कडून मिळत आहे. शासनाने तालुक्यांतील नागरिकांना रोजगानिर्मिती करिता आजंती परिसरात एमआयडीसी निर्मिती करून अनेक कंपनीच्या मालकांना कोरोडो रुपये भावाच्या या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या पण त्या जमिनी घेऊन तिथे उद्योगाची निर्मिती न करता त्या जमिनी खाजगी वापर करण्यात येतं असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आजंती एमआयडीसी मध्ये कोरोडोचा भष्ट्राचार झाल्याची चर्चा संपूर्ण हिंगणघाट शहरात सुरू आहे.
हिंगणघाटमधील एमआयडीसीच्या विकासानंतर या औद्योगिक पट्याचा विस्तार करण्यासाठी आजंती गावाला लागून असलेली शेकडो एकर जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली. या जागेचे प्लॉट पाडून ते उद्योजकांना देण्यात येणार आले. मात्र एमआयडीसीच्या चुकीच्या नियोजनामुळे उद्योजकांनी कवडीमोल पैसे भरूनही प्लॉट घेतले पण उद्योगाची उभारणी न करता त्या जमिनीवर मालाची गोडाऊन बनवली आहे. काही उद्योजकांनी तर ती जागा आपल्या खाजगी वापरासाठी वापरत आहे. त्यामुळे या एमआयडीसी वर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांची जागा कवडीमोल भावात विकत घ्यायची आणि तीच जागा जास्त दराने उद्योगांना विकायची ही नीती सुरू झाली आहे. उद्योग आले तर शेतक-यांच्या मुलांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र एमआयडीसीने शेतक-यांची जागा घेतल्यावर त्या जागेवर उद्योग अजूनही उभारलेले नाही. त्यामुळे शेतक-यांची एकप्रकारे फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.‘मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रचा’ नारा देणा-या एमआयडीसीच्या भोंगळ कारभाराची प्रचिती हिंगणघाटमध्ये आली आहे.
एमआयडीसी मध्ये अवैध धंदयाला ऊत.
आजंती एमआयडीसी मध्ये उद्योगाची उभारणी तर करण्यात आली नाही पण काही लोकांनी येथे गोडाऊन बनवून तिथे अवैध धंदे सुरू केली आहेत. या गोडाऊन मध्ये अनेक संशयपद काम करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उद्योजकांवर कारवाई होणार काय?
शासनाकडून उद्योगासाठी कवडीमोल भावाने जमिनी लाटून त्या त्यावर उद्योग न उभारता आपल्या खाजगी गोडाऊन साठी वापर करणाऱ्या अशा उद्योगपती वर कारवाई करणात येऊन त्या जमिनी सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348