✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संपूर्ण राज्यात सर्वात महत्वपूर्ण राजकीय चर्चा सुरू असलेली बातमी समोर येत आहे. शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मध्यंतरी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची बैठकही झाली. उद्या दादरमध्ये आंबेडकर हाॅलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत दोन्ही प्रमुख नेते आपली भूमिका मांडणार असल्याचे कळते.
प्रकाश आंबेडकरांनी मैत्रीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला होता. प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आधीच म्हटलं. त्यामुळे राज्यातील दोन्ही दिग्गज नेते लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी महायुतीत सामील होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेणार असून साऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महायुतीबाबत काय भाष्य केलं जाईल, हे पाहावे लागणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348