✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी कोकण सोडून इतर चार मतदार संघात निवडणूक लढणार आहे.
अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेवून जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मविआ आघाडीचा अजून पर्यंत पाठिंबा जाहीर झाला नाही. तर काही ठिकाणी भाजपने कोंडी केली आहे. त्यातच वंचितची प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
तर शिवसेना आणि वंचित बहुजन यांची युती झाल्यची चर्चा होती मात्र अजून पर्यंत अधिकृत जाहीर करण्यात आलं नाही. मात्र याची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.