श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आदित्य कृषि महाविद्यालय, बीड व ॲग्रीकल्चर अड्डा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 3 जानेवारी, २०२३ रोजी कृषि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कृषि क्षेत्रातील भविष्यातील रोजगार संधी (Career Opportunies for Agriculture Graduates in Future) या विषयावर आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय डॉ.अदितीजी सारडा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रशासकिय अधिकारी डॉ. अरुण मुंडे सर, आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. बी. तांबे सर, कृषि अन्नंतत्रंज्ञान महाविद्यालयाचे प्राचर्य श्री शामजी भुतडा सर, कृषि जैतंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ. सतिश कचरे सर, कृषि अभयांत्रिकी महवियालयाचे प्राचार्य श्री. अमोल सानप सर या मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कृषि क्षेत्रात भविष्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेद्वारे रोजगाराची सुवर्णसंधी सहज उपलब्ध होऊ शकेल असे प्रतिपादन डॉ. आदितीजी यांनी व्यक्त केले. या प्रसंगी प्रा.संदीप शामल, डॉ.मीनाक्षी राठी, प्रा. हिना नथानी, प्रा.आकाश बाजपे, प्रा.वर्षा हुडा, प्रा. न.जे. गावकरे यांनी कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधन केंद्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया, नाबार्ड या क्षेत्रानमध्ये स्पर्धा परिक्षेसंबंधी मोलाचे मा्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.