Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in क्रीडा, चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आकाश पिकलमुंडे, प्राची बघेल ठरले प्लेअर आफ द टूर्नामेंट.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर आयोजित तीन दिवसीय विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डीचे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. काल शेवटच्या दिवशी स्पर्धेचे बक्षीस वितरण शानदार सोहळ्यात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी सुभाष गौर, दिलीप रामेडवार, कुणाल चहारे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, श्रीमती सुमनताई मामुलकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, मोहसीनअली बंदाली, सेवा कलस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, सचिव शंतनु धोटे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. विद्युत मोहाडी संघाला प्रथम पुरस्कार ७१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय रामचंद्रराव धोटे माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे तर द्वितीय पुरस्कार एकलव्य नागपूर च्या संघाला ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील देशपांडे यांच्यातर्फे देऊन गौरविण्यात आले. महिला गटात रविंद्र क्रीडा मंडळ, उमरेड संघाला प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्यातर्फे तर द्वितीय पुरस्कार साई क्रीडा मंडळ काटोल च्या संघाला ३१ हजार रुपये रोख व चषक, श्रीमती मालतीबाई धोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यातर्फे देऊन गौरविण्यात आले. तसेच पुरूष गटातून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ११ हजार रुपये – विद्युत मोहाडी संघाचे आकाश पिकलमुंडे, प्लेअर आफ द मॅच, ७ हजार रुपये – एकलव्य नागपूर संघाचे वंश मुदलीवार, उत्कृष्ट पकड ७ हजार रुपये- विद्युत मोहाडी चे अनिकेत गभणे, उत्कृष्ट चढाई ७ हजार रुपये – एकलव्य चे सारंग देशमुख, तर महिला गटातून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ११ हजार रुपये – रविंद्र उमरेड ची प्राची बघेल, प्लेअर आफ द मॅच, ७ हजार रुपये – साई काटोल ची तनु ठाकरे, उत्कृष्ट पकड ७ हजार रुपये- साई काटोल ची मुस्कान लोखंडे, उत्कृष्ट चढाई ७ हजार रुपये – रविंद्र उमरेड ची हर्षा खडसे यांना देण्यात आले. तर अनेक सामान्यात विविध वैयक्तीक पुरस्कार देण्यात आले.

तीन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धांचे बहारदार संचालन छोटुलाल सोमलकर, एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रलय मशाखेत्री यांनी केले. या कार्यक्रमाला दहा हजार पेक्षा जास्त संख्येने राजुरा व परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इर्षाद शेख, प्रणय लांडे, अशोक राव, आकाश मावलीकर, रामेश्वर ढवस, रतन पचारे, मोहंमद वकील, शुभम खेडकर, राहुल बेतावार, निरंजन मंडल, राकेश बेतावार, मारोती रोहणे व टिम, वैभव बोरकुटे व टिम तसेच वेकोली कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन राजुरा कल्ब, सेवा कलश फाउंडेशन, इन्फंट जीजस सोसायटी, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राईस अकॅडमी यांनी केले.

Previous Post

कै. राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी सावनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न.

Next Post

दुचाकी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला दोन्ह तरुण उड्डाण पुलावरून खाली पडून जागीच ठार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दुचाकी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला दोन्ह तरुण उड्डाण पुलावरून खाली पडून जागीच ठार.

दुचाकी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला दोन्ह तरुण उड्डाण पुलावरून खाली पडून जागीच ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In