उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- रुक्मिणीबाई महिला को ऑप हौऊसिंग सोसायटी संजय नगर सांगली येथील महिला मंडळातर्फे रविवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला शक्तीचा जागर दिसून आला. या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.
मकरसंक्रांतीनिमित्त यावेळी विविध आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी महिलान मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले या सर्व महिलांनी मकरसंक्रांती जल्लोष आणि आनंद होता साजरी केली. यावेळी महिलानी वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे घेऊन कार्यक्रमात रंगत वाढवली.
यावेळी अध्यक्ष उषा कांबळे, सचिव स्मिता निकम, सदस्य मालन शीरगुप्पिकर, वर्षा जाधव, योगिता पोतदार, शोभा कांबळे, सीमा चौधरी, जयश्री कांबळे, सरिता मदवाने सर्व सभासद सदस्य संचालक व संजय नगर परिसरातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348