क्रांती कोंचिग क्लासेस व बुलंद आवाज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रत्येकामध्ये उपजत काहीतरी गुण असते प्रत्येकामध्ये एक कला असते आणि कलेला योग्य संधी मिळाली तर हे कलावंत भविष्यात देशातील नामवंत कलाकार होऊ शकतात असे प्रतिपादन आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी केले तसेच क्रांती कोचिंग क्लासेस व बुलंद आवाज ग्रुप यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक व्यासपिठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकाचे अभिनंदन केले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शरद विहीरकर संबोघित करताना म्हणाले की, सोशल मिडीयाच्या युगामध्ये वाचन संस्कृती मागे पडत आहे त्यासाठी प्रत्येक परिवाराने किमान एक पुस्तक दान करून एक समृद्ध अभ्यासिका निर्माण करता येईल यासाठी बुलंद आवाज ग्रुपच्या सदस्याने पुढाकार घ्यावा जेणेकरून गावामध्ये उत्कृष्ट अभ्यासिका तयार होईल व वाचनसंस्कृती जोपासता येईल असे प्रतिपादन केले. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थानी एक से बढकर एक अशा उत्कृष्ट नृत्यांचे अविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.
यावेळी सहभागी प्रत्येक विद्यार्थाना मोमेन्टो देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश विहीरकर ने तर सूत्रसंचालन पंकज विहीरकर व आभार मंगेश खापरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावातील हजारो रसिक प्रेक्षकांची उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन साठी बुलंदआवाज ग्रुप च्या सर्व सदस्यांनी व क्रांती कोचिंग विद्यार्थीनी सहकार्य केले.

