प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सर्वात असलेल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी किसान सेलच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, राष्ट्रवादी किसान सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थित या नियुक्त्या करण्यात आल्या. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करण्याचा दृष्टीकोनातून तुम्हा सर्वाना पक्षाकडून संधी देण्यात आली असल्याचे मत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी किसान सेल च्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी सुधाकर वाढई तर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष पदी किशोर चांभारे यांची नियुक्ती करत पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर श्रद्धा ठेवत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, राष्ट्रवादी किसान सभा वर्धा जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, नितीन भुते, नरेश चिरकुटे यांची उपस्थिती होती.