प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- पंचायत समिती हिंगणघाटला जि प हायस्कुल अंबाझरी नागपूर येथून नव्याने गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती अलकाताई हरिहर सोनावने मॅडम यांचा आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ वर्धा,हिंगणघाट शाखेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असणारी राज्यातील एकमेव व सर्वात जुनी स्वांतत्र्य पुर्व काळात स्थापन झालेली शिक्षक संघटना आहे. आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ बालकांना गुणवत्ता पुर्ण,दर्जेदार शिक्षण मिळण्याबाबत सतत आग्रही आहे.तसेच संघटना स्वतः शिक्षकांच्या क्षमता समृद्धी साठी (capacity Building)प्रशिक्षण आयोजित करत असते.शिक्षकांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव असणारी संघटनात्र आहे.कोरोना काळात शिक्षकांनी “कोरोना योद्धे” म्हणून विविध स्तरावर काम केले आहे. त्याचबरोबर कोव्हिड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली आहे. नेहमीच सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारी संघटना आहे.अशी संघटनेेची ओळख जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र इखार यांनी करून दिली.
सोबतच शिक्षकांच्या असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनेला सभेसाठी पाचारण करण्याची विनंती करण्यात आली.
सदरच्या सत्कारासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा अध्यक्ष श्री राजेंद्र इखार यांच्या नेतृत्वात श्री मधुकर चाफले,श्री प्रदीप ताटेवार, हिंगणघाट तालुकाध्यक्ष श्री गजानन भुते,सचिव श्री राजाभाऊ मनने, श्री गजानन आसकर,सौ माधुरी विहिकर,कु शुभांगीनी वासनिक,सौ वैशाली आसकर,सौ अनिता गुंडे,श्री सुरजप्रसाद वैद्य उपस्थित होते.