निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन घुग्घुस:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा कार्यकारणीच्या संकल्पनेतून साकरण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे यांच्या नेतृत्वात घुग्घूस शाखेच्या कार्यालयात येथील घुग्घुस पोलीस निरीक्षक बबन आर. पुसाटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ठाणेदार यांनी सांगितले की पत्रकारांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी कायम जुडून न राहता समाजाचा आरसा बनून राहावे व जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करून निर्भीड पत्रकारिता करावी.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा घुग्घूसचे अध्यक्ष सुरेश पी. खडसे, उपाध्यक्ष संजय जीवनकर, सचिव प्रणयकुमार बंडी, कार्याध्यक्ष इम्तियाज रज्जाक, संघटक प्रशांत चरडे, सहसंघटक संदीप चांभारे, कोषाध्यक्ष पंकज रामटेके उपस्थित होते.