पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे:– सिंहगड रोड पोलिसांनी कोयताधारी टोळक्याची भर रस्त्यात घड काढली. कोयताधारी टोळक्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या परिसरातील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी देण्यात आली आहे.
सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे एका तरुणावर पाच ते सहा जणांनी कोयत्याने डोक्यात, हातावर, मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण होऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तरुणावर खुनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. दरम्यान, सिहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. की, संशयित आरोपी गारमाळ येथील एका घरात दबा धरून बसले आहेत.त्यानंतर पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अमोल कट्टे व नीलेश खांबे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यानंतर पोलिसांनी गारमाळपासून ते धायरी येथील घटनास्थळापर्यंत त्यांची पायी रस्त्यावरून धिंड काढली.