माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भामरागड:- तालुक्यातील येचली (बासागुडा) येथे जय माँ मदनागिरी युवा क्रीडा मंडळ द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेचे पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक माजी आमदार दीपकदादा आत्राम देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून येचली ग्रामपंचायतचे सरपंच सौ. कामलाताई कुरसाम होते.
यावेळी उपस्थित कविता इतमवार महिला बालकल्याण सभापती नगर पंचायत भामरागड, तेजस्विनी मडावी नगर सेविका,लालसू आत्राम, संजय येजुलवार उपसरपंच येचली, आनंद दहागावकर पत्रकार, गणेश नागपूरवार, प्रभाकर मडावी, संतोष तलांडी, दशरथ बाकडा, रेनू तलांडी, रमेश गावडे, लालसू कुळ्यामी, समया गावडे, मदण्या गावडे, चिनू सडमेक, प्रमोद कोडापे, नरेंद्र गर्गम, सतुबाई पुजलवार, वैभव पूजलवार, दिनेश जुमडे, शामराव झाडे, सिद्धार्थ झाडे, श्रीनिवास कुम्मा, मदनया गावडे व मंडळाचे पदाधिकारी व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.