नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहन करून ध्वजवंदन केले. याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला सलामी देत वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यासमयी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासहित मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.