जोपर्यंत मृत्यू झालेल्या कूठूंबीयास 10 लाख रूप्याची मदत मीळणार नाही तोपर्यंत मृतदेह नेऊ देणार नाही.
तालूक्यातील सपूर्ण ग्राम पंचायत कर्मचारी यांच आंदोलन.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- तालुक्यांतील ग्राम पंचायत नंदवर्धन येथून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना समोर आली. त्यामुळे ग्राम पंचायत नंदवर्धन येथील प्रजासत्ताक दिनी संपूर्ण गावात शोककळा पसरली.
आज 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनाचा सोहळा झाल्यानंतर सबंधीत ग्राम पंचायत कर्मचारी लोकेश चौधरी ग्राम पंचायत नंदवर्धन यांना सचिव व सरपंच यांनी उपस्थित नागरीकान साठी जिलेबी व नास्ता आणण्यासाठी ग्राम सेवक यांनी स्वतःची दुचाकी गाडी देऊन पाठविले रस्त्यात प्रवासादरम्यान अपघात झाला व जागीच मृत्यू झाला, सदर कर्मचारी यांचा ग्राम सेवक यांनी अपघात विमा अद्याप पावेतो उतरवीला नाही, अपघात विमा उतरविणे बाबत सिईओ, गटविकास अधिकारी व संघटनेचे पत्र असतांना सुद्धा ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केलेला आहे.
उपरोक्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नास्ता देण्याची कोणतीही तरतूद नसताना, नास्ता आणण्यासाठी लोकेश चौधरी यांना जाणीवपूर्वक पाठविले आहे. त्यामुळे सरपंच सचिव यांचेवर मनुष्य वधाची कार्यवाही व्हावी, तसेच तात्काळ अपघात विमा देण्यात यावा तसेच त्यांचे वारसणास ग्रामपंचायतीचे सेवेत घेण्याचे आदेश द्यावेत, तो पावेतो प्रेत उचलायचे नाही- विलास कुमरवार, अध्यक्ष