नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एका टोळीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. परकीय चलनाऐवजी कागदाचे बंडल देऊन फसवणूक या टोळीने केली. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि ६४ सिम कार्ड हस्तगत केली असून याप्रकरणी अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात गस्त घालत असताना नेहरूनगर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने परकीय चलनाचे आमीष दाखवून फसवणूक केल्याचे कबुल केले.
या टोळीतील आरोपी अनोळखी व्यक्तींना फोन करून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलन असल्याची माहिती देत होते. परकीय चलन कमी किमतीत देण्याचे आमीष दाखवूत ते या व्यक्तीला पैसे देण्यासाठी निर्जन ठिकाणी भेटायला बोलवत होते. यावेळी इतर आरोपी व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याला परकीय चलनाऐवजी बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक करीत होते. या टोळीने अशा प्रकारे मुंबईत अनेकांना मोठ्या प्रमाणात गंडा घातला असून याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.