नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- बँक ऑफ इंडियाच्या सुवर्ण ऋण योजनेत तांबा आणि पितळेच्या दागिन्यांना तारण ठेवत, करोडोंचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मालाड पोलिसांनी दागिने प्रमाणीत करण्यासाठी ठेवलेली महिला सपना भट हिला अटक केली आहे. बँकेच्या मालाड येथील शाखेत हा प्रकार घडला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बैंक ऑफ इंडियाच्या योजनेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीच्या ७० टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. मालाड येथील शाखेतील सुवर्ण कर्ज घेतलेल्यांपैकी जवळपास १५ खातेदारांनी मुद्दल किंवा व्याज फेडले नसल्याचे बँकेच्या पडताळणीमध्ये समोर आले होते. कर्ज देताना दागिने तपासण्यासाठी बँकेतर्फे बहुचार इन्टरप्रायझेसची मालक असलेली आरोपी भट हिची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या कर्जदारांनी तारण म्हणून ठेवलेले दागिन्यांची तपासणी करणे ही तिची जबाबदारी होती. त्यानुसार, भटने ते प्रमाणित केले.
बँकेने १५ खातेदारांना कर्जाचे हप्ते थकल्यावर नोटीस बजावली. मात्र, एक व्यक्ती वगळता कोणीही कर्जाची रक्कम परत केली नाही. प्रतिसाद मिळत नसल्याने, बँके मान्यताप्राप्त दागिने व्यापाऱ्यांची मदत दागिने तपासले आणि बींग फुटले.

