संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत हात से हात जोडो अभियानाबाबत इंदिरा जिनिंग राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यात राजुरा शहर तसेच ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात हात से हात जोडो अभियान अधिक व्यापक करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा, विकासकामे, भारत जोड़ो यात्रेचे महत्त्व तसेच विरोधकांचा खोटारडेपणा, महागाई, बेरोजगारी व अन्य समस्या समजावून सांगा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कार्याध्यक्ष एजाज अहमद, माजी सभापती कुंदा जेणेकर, निर्मला कुलमेथे, शालुताई लांडे, भारती पाल, पूनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, मनिषा देवाळकर, शंकर गोनेलवार, आत्मा चे अध्यक्ष तिरुपती इंदूरवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरनुले, रामभाऊ ढुमणे, शंकर बोंकुर, सुरेश पावडे, तुकाराम माणुसमारे, अनंता ऐकडे, जगदीश बुटले, श्यामराव कोटनाके, जंगु येडमे, विकास देवाळकर, अनिल आलाम, बबन ताकसांडे, कवडू सातपुते, चेतन जयपूरकर, श्रीधर रावला, संदीप नन्नवरे, संदीप घोटेकर यासह राजुरा तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.