शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
मालेगाव:- वाशिम जिल्हात सतत सुरू असलेल्या मुसधार पाऊसा मुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकाचे जन जीवन विस्कळीत झाले आहे.
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे परिसरात आज सकाळ पासून च सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येथून गेलेल्या परिसरातील गाव खेड्यातील नदी नाल्यांना पुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच कमी अंतराच्या अकोला वाशीम या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गावर असलेल्या अमानवाडी रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या काटेपूर्णा नदीला पूर आल्याने येथील पुलावरून पाणी सकाळपासून ओसंडून वाहत असल्याने जऊळका ते अमानवाडी वाहतूक बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. प्रवासाची व शालेय शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्याची तारांबळ उडाली असून प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.