✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 29 जानेवारी:- सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. आता यावर आदेश बांदेकर यांनी ट्विट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना जोरदार टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायक मंदीराचा विषय राज्यात चांगलाच गाजत आहे. सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र या आरोपांना आदेश बांदेकर यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर देण्यात आले नव्हते. अखेर ट्विट करत आदेश बांदेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यशवंत किल्लेदार यांना टोला लगावला आहे. यशवंत किल्लेदार हे आपल्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याचं आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे.
आदेश बांदेकर यांनी ट्विट करत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना टोला लगावला आहे. आदेश बांदेकर यांनी याबाबत सलग दोन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना.अजूनही मी मर्यादा पाळत आहे’ असं म्हणत बांदेकर यांनी एक प्रकारे मनसेला इशाराच दिला आहे.
तर आदेश बांदेकर यांनी आणखी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये.आजच दादर पोलिस स्टेशन आणि सिद्धिविनायक सीसीटीव्ही टिमच्या सहाय्याने एका माऊलीचे टॅक्सीत राहिलेले काही लाख रूपये परत मिळवून देण्यात यश मिळाल्याबद्दल दादर पोलीस स्टेशन कडून टिमला धन्यवाद देण्यात आले’.