✒️उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली,दि. २९ जाने:- माधवबाग सांगली एस. टी. स्टँड शाखेच्या वतीने हार्दिक स्नेहमेळावा घेण्यात आला. माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर स्नेहमेळाव्यात हृदयविकार, उच्चरक्तदाब व मधुमेह या विकारात आवश्यक प्राणायाम या संबंधी माधवबाग सांगली एस. टी. स्टँड शाखेच्या क्लिनिक हेड डॉ. प्रियांका गायकवाड यांनी व्याख्यान दिले व विविध आजारांवर उपयुक्त प्राणायामाचे प्रात्यक्षिकही दाखवले.
यावेळी मधुमेह व हृदयरोगापासून बरे झालेल्या रुग्णानी मनोगत व्यक्त केले व असेच मार्गदर्शन लाभत राहावे अश्या सदिच्छा व्यक्त केल्या. स्नेहमेळाव्याचे आयोजन संगीता अड्सुळे, वैशाली माळी, प्रकाश शिवपालक, आकाश ताटे यांनी केले.